मावळ तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विनोद टकले यांची, तर उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या सचिव पदी संजय शिंदे, खजिनदार पदी सुधीर खांबेटे, तज्ञ संचालक पदी तुकाराम काटे, केशव कुल यांची निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संचालक पदी विजय शेटे, दत्तात्रय पिंजण, दत्तात्रय शिंदे, संतोषजी परदेशी, कैलास चव्हाण, अमर खळदे, किरण किल्लेवाला, श्रीमती कल्पना चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून निखारे साहेब यांनी कामकाज पाहिले. ( vinod takle elected as a president of dharmaveer sambhaji nagari sahakari patsantha maval )
यावेळी धर्मवीर नागरिक सहकारी पतसंस्थेच्या 2024 कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मावळ तालुका अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेत, पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे सर्व आजी-माजी संचालक, पतसंस्थेचे कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– जात वैधता प्रमाणपत्र काढायचंय? घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
– देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप
– ‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’