पंचायत समिती मावळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांची व्यवसायिक कौशल्य विकास कार्यशाळा गणेश मंगल कार्यालय कामशेत येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळ प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांना मार्गदर्शन केले व जे बचत गट व्यवसाय करत आहेत त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका आणि मावळ प्रबोधिनी संस्थेमार्फत सर्वोतोपरी मदत व सहकार्य केले जाईल. त्याचसोबत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या बचत गटांसाठी असलेल्या सर्वच योजनांचा लाभ बचत गटांना मिळवून देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करणार असल्याचे सांगितले. ( Vocational skill development workshop for registered women self help groups of Maval taluka held in Kamshet )
त्याचसोबत गटविकास अधिकारी सुधीर भागवत साहेब यांनी महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन पंचायत समितीच्या माध्यमातून करत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या महिला बचत गटांनी पुढे येऊन तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मावळ प्रबोधिनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे ह्या संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल मावळ प्रबोधिनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे या दोन्ही संस्थांचे आभार मानले.
हेही वाचा – आमदार आश्विनी जगताप यांची चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी
यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे अध्यक्ष अनिश होले, रिलायन्स रिटेल चे शिशिर सिंग आणि सुनील काळे, शाश्वत कृषी विकास कंपनीचे संचालक विजय ठूबे, आठवडे बाजार संकल्पनेचे निर्माते राजेश माने व गणेश चव्हाण इ. प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, भाजपा कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे, मावळ तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष अशोक सातकर, भालचंद्र लेले यांच्यासह मावळ तालुका उमेद अभियानांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग व तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक