मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारपासून (१८ एप्रिल) भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८ तर पनवलेमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५ मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार ३२३ मतदार आहेत. निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ मतदारसंघातील पिंपरीत तीन लाख ६४ हजार ८०६, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८, मावळमध्ये तीन लाख ६९ हजार ५३४ तर पनवेलमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५, कर्जत तीन लाख चार ५२३ आणि उरणमध्ये तीन लाख नऊ हजार २७५ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील १३ लाख २९ हजार ७४८ तर पनवेल, कर्जत, उरणमधील ११ लाख ७९ हजार ७१३ मतदार असून, पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख ५० हजार जास्त मतदार आहेत. तर, १३ लाख १० हजार ४३४ पुरुष तर ११ लाख ९८ हजार ८६८ महिला आणि इतर १५९ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. २४ हजार २७८ नवमतदार असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे २२ हजार ३८० तर शंभरपेक्षा जास्त वय असणारे एक हजार ३५८ मतदार आहेत. दोन हजार ५६२ मतदान केंद्र आहेत. त्यात शहरी एक हजार ६९१ तर ग्रामीण भागात ८७१ केंद्र आहेत.
- प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला, युवक, दिव्यांग यांच्याद्वारे संचलित एक, आदर्श सहा असे एकूण २४ विशेष मतदान केंद्र असणार आहेत. तीन हजार ५९४ मतदान यंत्र तर तीन हजार ८१९ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. मतदानाच्या दिवशी एक हजार २८१ पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत दोन लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आचारसंहिता भंगाच्या ५० तक्रारी निकाली काढल्या आहेत. मतदारांना उन्हात उभे राहू लागू नये यासाठी मंडप टाकण्यात येणार आहे. पाण्याची सोय केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान केंद्रात घेतले जाईल. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. ( Voter Of Chinchwad and Panvel will decide new MP of Maval Lok Sabha Constituency )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News
– आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade
– ‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha