Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात भाजपाकडून मतदार नाव नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तळेगाव दाभाडे शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांतील अनेक ठिकाणी यासाठी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय जनता पार्टी कार्यालय मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे, मराठा क्रांती चौक तळेगाव दाभाडे (स्टेशन) आणि युनिक हॉस्पिटल जवळ मनोहर नगर येथे नवीन मतदार नावनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अंतर्गत नवीन मतदार नावनोंदणी – फॉर्म 6 , मतदार यादीमधून नाव वगळ्यासाठी – फॉर्म 7, मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी फॉर्म 8, मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी – फॉर्म 8 अ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ( Voter registration campaign started on behalf of BJP in Talegaon Dabhade )
जास्तीत जास्त मतदारांनी आपली नाव नोंदणी करून लोकशाही सशक्तिकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन भाजपा तळेगाव दाभाडे शहर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष संतोष दाभाडे, श्रीकृष्ण भेगडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, स्वप्निल भेगडे, तनुजा दाभाडे, अतीश रावळे, शिवांकुर खेर, युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, अमित भागीवंत, सतीश पारगे, मृदाला भावे, मंगेश थोरवे, अनिल वेदपाठक, पौर्णिमा उपाध्याय, संध्या जाधव, स्मिता पोरे, विनोद उपाध्याय आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ