Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा एकत्रित निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा सत्ता आली आहे. दरम्यान तब्बल साडेचार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोणावळेकर जनतेने नवोदित नगरसेवक निवडण्याकडे आपला कल नोंदविला आहे. यामुळे एकूण 28 नगरसेवकांपैकी नगराध्यक्षपदासह यंदा एकूण 23 नवीन चेहरे सभागृहामध्ये दिसणार आहेत.
नगराध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे यांना लोणावळ्यातील नागरिकांनी कौल दिला आहे. राजेंद्र सोनवणे यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही मात्र त्यांच्या चेहऱ्याला नागरिकांनी प्रथम पसंती देत तब्बल 10681 मतांच्या फरकांनी त्यांना विजय केले आहे.
प्रथमच नगरसेवक :
लोणावळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मधून सना चौधरी व सनी दळवी, प्रभाग क्रमांक दोन मधून मंगेश मावकर व अनिता अंबुरे, प्रभाग क्रमांक तीन मधून श्वेता गायकवाड व लक्ष्मी पाळेकर, प्रभाग क्रमांक चार मधून गायत्री रिले, प्रभाग क्रमांक पाच मधून वसुंधरा दुर्गे व सुभाष डेनकर, प्रभाग क्रमांक सहा मधून रेश्मा पाठारे, प्रभाग क्रमांक सात मधून आरती तिकोने, प्रभाग क्रमांक आठ मधून सनी घोणे व दीपक अग्रवाल, प्रभाग क्रमांक 9 मधून नयना पैलकर व मोबीन इनामदार, प्रभाग क्रमांक दहा मधून वैशाली मोगरे व अनिल गवळी, प्रभाग क्रमांक ११ मधून भाग्यश्री जगताप, प्रभाग क्रमांक 12 मधून स्वरूपा कदम व सुमित गवळी तर प्रभाग क्रमांक 13 मधून धनंजय काळोखे, प्रियंका कोंडे व सोनाली मराठे या नवीन चेहऱ्यांना नागरिकांनी कौल दिला आहे.
चार माजींना संधी :
माजी नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक चार मधून माजी नगराध्यक्ष उषा चौधरी, प्रभाग क्रमांक सहा मधून माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, प्रभाग क्रमांक सात मधून माजी नगरसेवक देविदास कडू, प्रभाग क्रमांक 11 मधून माजी नगरसेवक जीवन गायकवाड यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
सभागृहात दिसणार महिलाराज :
लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये 27 नगरसेवकांपैकी 16 महिला नगरसेविका असणार आहेत. लोणावळा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदावर जरी राजेंद्र सोनवणे हे असले तरी सभागृहामध्ये मात्र महिलाराज पाहायला मिळणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

