Dainik Maval News : पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली आहेत. तर सुधारित अहवालास वर्ष होत आले आहे. यानंतरही राज्य सरकारच्या दफ्तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीन आहे. या प्रकल्पाचा पूर्वी 4884 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तो आता 5100 कोटी झाला.
- राज्यातील प्रमुख मंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. सरकारने या प्रकल्पासाठी अर्धा खर्च करण्याची तयारी दर्शविली. मात्र परिपत्रक काढले नाही. त्यामुळे रेल्वेने हा प्रकल्प साइड ट्रॅकवर ठेवला आहे. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. राज्यातील दोन महानगर असणाऱ्या पुणे व मुंबईला कमी वेळेत जोडण्यासाठी व रेल्वेची वारंवारिता वाढविण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
मात्र सरकारने यासाठी बैठकी घेण्यापलीकडे काहीच केले नाही. राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) डीपीआर सादर केला. पाच वर्षांत दोनवेळा डीपीआर सादर करण्यात आला. मात्र त्यावर निर्णयच झाला नाही. परिणामी प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. पाच वर्षांत प्रकल्पाची किंमत 216 कोटी रुपयांनी वाढली आहे.
पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प रखडल्याने त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे व मालगाड्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय लोणावळा ते कर्जत हा घाट विभाग असल्याने गाड्यांचा वेग कमी असतो. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे पुणे ते लोणावळादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका असणे आवश्यक आव्यक आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News