चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( want a fancy number for a four wheeler new serial from RTO soon know registration process )
- हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. हा धनाकर्ष किमान 301 रुपयांपेक्षा जास्त तसेच ‘आर.टी.ओ.पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृह परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तिसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.
आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीच्या प्राधिकार पत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे. ( want a fancy number for a four wheeler new serial from RTO soon know registration process )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण