Dainik Maval News : मावळ तालुक्यात वारकरी भवन उभारावे, यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मावळ तालुक्यातील श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच वारकऱ्यांशी संबधित विविध मागण्या करण्यात आल्या.
हभप गणेश महाराज जांभळे (अध्यक्ष, श्री विठ्ठल परिवार मावळ) हभप बाळासाहेब महाराज आडकर (उपाध्यक्ष, श्री विठ्ठल परिवार मावळ) हभप नितीन महाराज काकडे (अध्यक्ष, नामजप समिती), हभप लक्ष्मण सातकर (अध्यक्ष, सप्ताह समिती) हभप दत्ता महाराज केदारी (उपाध्यक्ष, सप्ताह समिती) हभप बाळासाहेब जांभुळकर (अध्यक्ष, विणेकरी समिती) हभप बाबाजी बालगुडे (बालसंस्कार वर्ग समिती) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना हे निवेदन दिले.
श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या :
1. श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी पायी जाणाऱ्या दिंड्यांना प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जागा आरक्षित करावी.
2. मावळ तालुक्यामध्ये शासनाच्या वतीने वारकरी भवन उभारावे.
3. शाळेत श्रीमद्भगवदगीता, गीता पठण व संत साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे.
4. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी संत अवतीर्ण झाले, त्या भूमीला संत भूमी असे फलक लावावे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान