उन्हाळ्यात वनक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटतात, अशावेळी पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. उन्हाच्या झळांमुळे जीवाची काहिली शमवण्यासाठी वनक्षेत्र सोडून अनेकदा हे वनजीव मानवी वास्तीकडेही धाव घेतात. त्यामुळे वन्यजीवांना उन्हाळ्यातही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाण्याची उपलब्धता व्हावी, यासासाठी वनविभागाकडून वॉटर होल ही संकल्पना राबवली जात आहे. ( Water hole for wildlife in Maval Shirota Forest Division )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत वाढत्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने वन्यजीवांसाठी पाणवठा बनवण्याचे काम मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रविण आणि उपवनसंरक्षक पुणे, राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूण 30 ठिकाणी वॉटर होल ची निर्मिती करण्यात येत आहे.
त्यापैकी मौजे राकसवाडी येथील पूर्ण झालेल्या पाणवठ्यामध्ये वन्यजीवांसाठी टँकरव्दारे पाणी सोडण्यात आले. सदर ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपरीमंडळ अधिकारी उकसान श्रीमती एम. बी. घुगे तसेच वनरक्षक जी. बी. गायकवाड आणि वनरक्षक डी. डी. उबाळे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘दैनिक मावळ’च्या बातमीचा दणका! कामशेतमधल्या महावितरणच्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन, नागरिकांच्या लढ्याला यश
– छत्रपती शिवाजी महाराज की…जय!! मावळमधील साते गावात छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे लोकार्पण