Dainik Maval News : कामशेत शहरातील अनेक भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. फेब्रुवारी महिना मध्यात आला असता उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशात पाण्याची गरज वाढली असताना मागील चार दिवसांपासून इंद्रायणी कॉलनीत भागातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गेली चार दिवसांपासून सार्वजनिक नळाला पाणीच आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.
- कामशेत परिसरातील सहारा कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी, आदर्श कॉलनी आदी भागात नियमित पाणी येत नाही. कामशेत मधील उर्वरित भागात दररोज पाणी सोडले जाते. परंतू या भागात चार दिवसांनी पाणी येते. जे पाणी येते ते गढूळ पाणी येत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत.
पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना अनेक वेळा शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
हंडा मोर्चा काढण्याचा इशारा
इंद्रायणी कॉलनीत ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा गेली चार दिवसांपासून खंडित झाला आहे. ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा. ग्रामपंचायतीकडून यादरम्यान पाण्याची कोणतीही सोय केली गेली नाही. त्यामुळे नागरिकांना खिशातील पैसे घालवून पाण्याचे टँकर मागवावे लागले. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणी देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांच्या वतीने सांगण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश

