व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी

मंडळी, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही ऊसाचा रस प्यायला थांबलात, तर त्या ठिकाणच्या रसवंती गृहाचे नाव हे 'नवनाथ रसवंती गृह' किंवा 'कानिफनाथ रसवंती गृह' असंच असल्याचं तुम्हाला दिसेल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2024
in मावळकट्टा
Why is name of every Raswanti house Kanifnath or Navnath Read story of Raswanti Griha

Photo Courtesy : Team Dainik Maval


मंडळी, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही ऊसाचा रस प्यायला थांबलात, तर त्या ठिकाणच्या रसवंती गृहाचे नाव हे ‘नवनाथ रसवंती गृह’ किंवा ‘कानिफनाथ रसवंती गृह’ असंच असल्याचं तुम्हाला दिसेल. परंतू, तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की, प्रत्येक रसवंती गृहाचे नाव हे कानिफनाथ किंवा नवनाथ असंच का असतं म्हणून? चला तर मग, आज या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. म्हणजेच, ऊसाचा रस मिळणाऱ्या रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ( अशाच माहितीसाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सध्या उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यात लोकसभेच्या निवडणूकाही आहेत. अशात अमृततुल्य ठिकाणच्या ‘चाय पे चर्चा’ पेक्षा नवनाथ रसवंती गृहात ‘रस पे चर्चा’ जास्त होऊ लागल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात ऊस पट्ट्यातील कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो, नाहीतर पाण्याची टंचाई असणारे नांदेड, लातूर भाग असो. किंवा मग राज्याची राजधानी मुंबई असेल नाहीतर पुणे, नाशिक सारखी ठिकाणं असतील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किमान एखादं तरी ऊसाचं रसाचं दुकान दिसेलच. महत्वाची बाब म्हणजे हे दुकान एकतर नवनाथ रसवंती गृह नावाने असणार, नाहीतर कानिफनाथ रसवंती गृह नावाने, पण हि दोन नावे सोडून तिसऱ्या नावाचं ऊसाचं रस मिळणारं दुकान सापडणं, मुश्किलच.

  • हिरव्या रंगाची जाळी लावलेलं किंवा पत्राच्या शेडमध्ये असलेलं स्वच्छ टापटीप रसवंतीगृह, हे या दुकानांचे वैशिष्ट्य. दुकानात सुंदर असा नवनाथ महाराजांचा फोटो लावलेलं चित्र आपल्या दिसणार. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढताना दिसतील. आणि घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो तो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. हेच ते प्रत्येक रसवंती गृहाचं ढळढळीत चित्र. पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही गेलात तरीही रसवंतीगृहामध्ये फार पूर्वीपासून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं.

पण प्रश्न हा की, एकाच नावाची नवनाथ रसवंतीगृह पाहिल्यावर कुणाला असं वाटणं साहजिकच आहे की, ही सगळी रसवंतीगृह काय एकाच माणसाच्या मालकीची आहेत की काय? जसं मॅकडोनाल्ड, केएफसी यांच्या फ्रँचाइझी आहेत, तशाच ह्याही फ्रँचाइझी आहेत का? पण असं काही नाही. यामागे लपलीये, ती नवनाथ रसवंती गृहाच्या जन्माची कथा. ( Why is name of every Raswanti house Kanifnath or Navnath Read story of Raswanti Griha )

अशी झाली रसवंती गृहाची सुरुवात…
तर ही गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि गाव बोपगाव. पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने हा पट्टा तसा दुष्काळीच. (आता थोडा बदलाय म्हणा.) इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांचे पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हतं. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता.

अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथं गेल्यावर त्याला कळालं की इथं आपल्या उसाला इथं भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी उस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथं हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथं जातील तिथं दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.

रसवंती गृहाला नवनाथ हेच नाव का?
बोपगावजवळच्या डोंगरावरील गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी कानिफनाथ ठेवलंय.

“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे !” अशी लोककथा आहे. त्यामुळे, भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथांना ऊस, रस, गूळ आवडतो ! इतका सिंपल अर्थ आहे ! दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे. त्यामुळे नवनाथ रसवंती, कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला.

पूर्वी बैलांनी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलांनी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे. नवनाथ / कानिफनाथ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृह वाले सुद्धा तेच नाव वापरू लागलेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.. धन्यवाद!


Previous Post

अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा

Next Post

किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
bhanu-khalade-talegaon-dabhade

किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.