कासारसाई ते शिरगाव रस्त्यावर एका भरधाव दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालक आरोपीविरोधात शिरगाव पोलिसांत भा.द.वि. कलम 304 (अ), 337, 338, 279 आणि मो.वा. अँ. 148, 177, 134 (1)(2) अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी सायंकाळी पाऊणे सहाच्या वाजताच्या दरम्यान मौजे दारूंब्रे गावच्या हद्दीत नानाचा ढाबा हॉटेलजवळ शिरगाव ते कासारसाई रस्त्यावर हा अपघात घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) कन्हैया मारुती सोरटे (वय 30 वर्षे, रा. दारूंब्रे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात हिराबाई साहेबराव मोरे (वय 70) या महिलेचा मृत्यू झाला आहे. ( Woman dies in two-wheeler accident case registered in Shirgaon police Maval Crime )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख आणि वेळेला फिर्यादी कन्हैया सोरटे यांची आत्या हिराबाई साहेबराव मोरे (वय 70 वर्षे सध्या रा. दारुंब्रे ता. मावळ) या कासारसाई कारखान्यापासून दारुंब्रे दिशेने पायी चालत जात होत्या. तेव्हा एका अज्ञात मोटार सायकल स्वाराने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल कासारसाई कारखान्याकडून दारूंब्रे गावाच्या दिशेने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून हिराबाई मोरे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात हिराबाई साहेबराव मोरे ह्या गंभीर जखमी होऊन मृत पावल्या. त्यावेळी अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला, असे फिर्यादीत नमुद आहे. पोलिस हवालदार धायगुडे हे पुढील तपास करत आहे.
अधिक वाचा –
– ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा
– ‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News