Dainik Maval News : रात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरुन जाणाऱ्या जोडप्यास लुटण्याचा प्रकार इंदुरी (ता. मावळ) येथे घडला आहे.
शुक्रवारी (दि. 25) वडगाव मावळ येथे लग्न समारंभ आटोपून दीपक रामचंद्र ढोरे (वय 55 रा. इंदुरी) आणि त्यांची पत्नी मेघा दीपक ढोरे (वय 50 रा. इंदुरी) हे दोघे इंदुरीच्या दिशेने मोटारसायकलवर जात होते.
तळेगाव-चाकण रोडवर कोटेश्वरवाडी फाट्याजवळ त्यांच्या मोटरसायकलला दोन अज्ञातांनी मोटरसायकल आडवी घालून अडवले. त्यांनी मेघा ढोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे 8 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
यावेळी झालेल्या झटापटीत मेघा जखमी झाल्या असून त्यांना पोटाला, डोक्याला आणि हाताला लागले आहे. जखमीस तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल केले असून प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News