Dainik Maval News : वडगाव मावळ येथील पोटोबा मंदिर परिसरात (दि १०) एप्रिल २०२५ रोजी एक जबरी चोरी घडली आहे. ज्योती लोकरे (वय ३५ वर्षे, गृहिणी, रा. लक्ष्मी सोसायटी, दिग्विजय कॉलनी, वडगाव) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२५ रोजी सायं. ७:३० वाजता पोटोबा मंदिराजवळ कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमासाठी महिलांचे रांगेत उभी असताना, अनोळखी महिलेने (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, नाव व पत्ता माहित नाही) ज्योती लोकरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (१.५ तोळे वजनाचे) चोरून घेतले.
ही घटना फिर्यादीच्या संमतीशिवाय झाली असून, आरोपीने मणी मंगळसूत्र ओढून घेतले. या चोरीमुळे फिर्यादीला १,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीला शोधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News