बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. त्यामुळेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे तळेगाव पोलिस ठाण्यात पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. पोलिस बांधवांना ऑन ड्युटी असताना मिळालेला हा सुखद धक्का होता. ( women colleagues of inner wheel club tied rakhi to talegaon dabhade police )
इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे मधील सभासदांनी आज, बुधवार (दिनांक 30 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे लिंब फाटा पोलीस चौकीमधील पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. पोलिस हे समाजासाठी अविरत, अव्याहतपणे सेवा बजावत असतात. सामाजिक सुरक्षा आणि सलोख्यासाठी ते सदैव कर्तव्यावर असतात. सदैव ताणतणावाचा सामना करत असतात. त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवून रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांनी कृतज्ञता म्हणून अध्यक्षा संध्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्याचे ठरवले.
हेही वाचा – वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी
खास बाब म्हणजे तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधल्या. अनपेक्षित सुखद धक्क्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही विशेष आनंद झाला. यावेळी अध्यक्षा संध्या थोरात यांनी इनरव्हील क्लब बद्दल थोडक्यात माहिती दिली. निशा पवार, रश्मी थोरात, संगीता शेडे, शर्मिला शहा आणि वैशाली जामखेडकर तसेच साधना भेगडे, ज्योती देशपांडे, शलाका वाणी, अरुणा कुलकर्णी, चांदनी गांधी, मोहिनी भेगडे आदी महिला भगिनी यांनी पोलिस बांधवांना शुभेच्छा देत रक्षाबंधन केले. ( women colleagues of inner wheel club tied rakhi to talegaon dabhade police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन
– चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या वर्गमित्रांच्या मनगटावर बांधल्या; चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे
– पंतप्रधान मोदींचे देशातील महिला-भगिनींना रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट; एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयाने कमी