पिंपरी-चिंचवड युवा सेनाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. साफसफाईचे काम करणाऱ्या 200 महिलांना साड्या वाटप केले. थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला सरिता श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे, शिवसेनेच्या महिला शहर संघटीका सरिता साने,युवतीसेना शहर संघटीका रितू कांबळे, आयोजिक सायली साळवी, रंजना साळवी, अर्चना गुरव, इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कार्यक्रमात जवळपास 300 महिलांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांबरोबरच कष्टकरी महिला, सफाई कर्मचारी महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कविता सतीश गुख, डॉ. ऋतुजा मयूर पाटील,डॉ. वैष्णवी मयूर तेली, शिक्षिका सुनीता जमडकी, नेत्रा चंद्रकांत शेलार यमुना खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर, शितल गिरे, पत्रकार शिवानी धुमाळ, शबनम सय्यद, उत्कृष्ठ साफसफाई योगिता जाधव, संगिता केदारी, अंजुषा कापसे, वकील तेजश्री स्वप्निल नरळे यांचा सन्मान करण्यात आला. ( Women were honored on occasion of International Womens Day Pimpri Chinchwad )
विश्वजित बारणे म्हणाले की, महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या भागात घेतले जातात. महिलादिन का साजरा केला जातो. १९०९ मध्ये अमेरिकेत सर्व महिलांना एकत्र येऊन चळवळ उभी केली जाते. तेव्हापासून सर्व जगात ८ मार्चला महिला दिन साजरा केला जातो. सर्वात मोठा त्याग महिला करतात. कष्ट करतात. साफसफाई, आरोग्य सेविका, शिक्षिका महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. सरिता बारणे, सरिता साने , रितू कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गुरव यांनी केले. सूत्रसंचालन रंजना साळवी यांनी केले. तर, नेत्रांजली शेलार यांनी आभार मानले. आयोजन सायली साळवी यांनी केले.
अधिक वाचा –
– शरद पवार यांचा सज्जड दम, आमदार सुनिल शेळके यांचीही तातडीने पत्रकार परिषद, ‘पुरावे दाखवा नाहीतर…’ । Sunil Shelke & Sharad Pawar
– कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल
– मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन