Dainik Maval News : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा मंगळवारी (दि.1 एप्रिल) कामशेत येथे सन्मान करण्यात आला. कामशेत पत्रकार संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलस्वामी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, सविता साबळे, सारिका पडवळ, दत्तात्रय शिंदे, अतिष थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमात सुनंदा भोसले (आदर्श महिला प्रशासकीय अधिकारी), भिकाबाई वाघमारे (आदर्श महिला समाजसेविका), मंगल साळुंखे (आदर्श महिला आरोग्यवर्धिनी), तनुश्री शर्मा (आदर्श शिक्षिका) योगिता मून (अनाथांची माय), अर्चना जोगळेकर (आदर्श महिला कलावंत) राजमुद्रा बचत गट, विमल वाघमारे (आदर्श बचत गट), रेशमा फडतरे (आदर्श महिला पत्रकार), छाया गोणते (आदर्श माता) जयश्री सपकाळ (आदर्श महिला पोलीस पाटील) सुवर्णा कुंभार (आदर्श महिला राजकीय) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News