मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई विनायक कोंढभर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (बुधवार, 8 मार्च) म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ( Womens Day 2023 Janabai Kondhabhar Elected Unopposed Deputy Sarpanch of Shilatne Gram Panchayat Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिलाटणे ग्रामपंचायतच्या मावळत्या उपसरपंच अश्विनी भानुसघरे यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पूर्ण केल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पदाच्या रिक्त जागी निवडीसाठी सरपंच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेविका रुपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी निर्धारीत वेळेत जनाबाई कोंढभर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी जाहीर केले.
ग्रामपंचायत सरपंच गुलाब आहिरे, ग्रामसेविका रुपाली जाधव, माजी उपसरपंच अश्विनी भानुसघरे, निर्मला भानुसघरे, माधुरी भानुसघरे, रुपाली कोंडभर, मनिषा भानुसघरे, कांचन भानुसघरे, सदस्य शरद आहिरे, सदस्या सोनली येवले आदी उपस्थितांनी यावेळी जनाबाई कोंढभर यांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली
– धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू