आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मावळ तालुक्यातील आदर्श गाव भोयरे येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता करणे कामाचा भूमिपूजन समारंभ सोमवारी (दिनांक 29 मे) रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून मुख्य रस्त्यापासून नवीन समाज मंदिर ते जुने समाज मंदिर असा रस्ता करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भूमिपूजन समारंभ प्रसंगी सरपंच वर्षा भोईरकर, उपसरपंच ऋषिकेश खुरसुले, माजी सरपंच बळीराम भोईरकर, बाबुराव आडीवळे, काळुराम भोईरकर, मदन आडीवळे, ग्रामसेविका प्रमिला सुळके, ग्रामपंचायत सदस्य रामदास भोईरकर, संगीता वाघमारे, यशवंत डोळस, प्रवीण भोईरकर, मोहन आडीवळे, संदीप डोळस, निखिल भोईरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवना धरणातील जलसाठ्यात मोठी घट! पावसाने दडी मारल्यास पाणीकपातीचे संकट, पाहा सध्याचा पाणी साठा
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News