Dainik Maval News : माझ्या विरोधात एकवटलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगावे, कोरोना महामारीमध्ये मावळ तालुक्यातील मायबाप जनतेला आधाराची गरज होती, तेव्हा तुम्ही कोठे होता, असा प्रश्न मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे.
शेळके म्हणाले की, केवळ एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन एकत्र येत मावळ तालुक्यातील नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थाचे व खुनशी राजकारण करत तालुक्यातील जनतेला खोटे-नाटे सांगण्याचे उद्योग चालू केले आहेत. ज्या रस्त्याने ते जात आहेत तो रस्ता देखील मागील पाच वर्षांमध्ये झालेला आहे. ज्या पुलावरून ते जात आहेत ते पूल देखील मागील पाच वर्षांमध्ये उभे राहिलेले आहेत.
2019 साली मावळच्या जनतेने मला विश्वासाने निवडून दिले, त्यांच्या विश्वासाला पात्र होत पाच वर्ष मी या मावळ तालुक्यामध्ये विकास कामे करत आहेत. अहोरात्र धावत आहे, म्हणूनच या तालुक्याच्या विकासासाठी 4158 कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करून आणू शकलो. अनेक कामे सुरू झाली आहेत, काही कामे निवडणुकीनंतर सुरू होणार आहेत. अजूनही मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप काही करायचं आहे. अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये आले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी व या मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी जनतेकडे संधी मागत आहे, असे त्यांनी सांगितले.
ते ‘पगारी’ नव्हे जिवाभावाचे कार्यकर्ते – शेळके
मी जनतेच्या सुख-दुःखात सदैव उभा राहिलो म्हणून आज मावळ तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ज्यावेळी या जनतेला आपल्या आधाराची गरज होती, तेव्हा मात्र तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडत ‘मी व माझे कुटुंब’ म्हणत घरामध्ये बसले होते. हा संपूर्ण मावळ तालुका हेच माझे कुटुंब आहे, असे म्हणत मी व माझे असंख्य कार्यकर्ते या मावळवासीयांच्या सेवेसाठी कोरोना सारख्या महामारीत रस्त्यावर उतरून काम करत होतो. ज्यांना आज तुम्ही ‘पगारी’ म्हणून हिणवता तेच माझे जिवाभावाचे कार्यकर्ते त्यावेळी या मावळ तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत होते, असे शेळके यांना विरोधकांना सुनावले.
कोरोना काळात काय केले?
दिवस- रात्र सेवा केली म्हणून कोरोना सारखी महामारी मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करू शकली नाही. ज्यांना कोणाला कोरोनाची लागण झाली, त्यांना रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देणे, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर, ऑक्सीजन सिलेंडर मिळवून देणे, कोविड सेंटर तयार करून त्या ठिकाणी त्यांचे विलगीकरण करून घेणे, त्यांची जेवणाची सोय, त्यांचे समुपदेशन करणे ही कामे केली. मावळ तालुक्यामधील जवळपास 56 हजार नागरिकांना अन्नधान्याचे कीट देण्याचे कार्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केले. नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते त्यांना घरोघरी भाजीपाला देण्याचे काम देखील माझ्या या कार्यकर्त्यांनी केले, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke
– सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade