व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News

मॅनेजर सतत काम सांगत असल्याचा राग मनात धरून कामगाराने मॅनेजरला मृत्यू होईल इतपत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


मॅनेजर सतत काम सांगत असल्याचा राग मनात धरून कामगाराने मॅनेजरला मृत्यू होईल इतपत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मारहाणीचा हा गंभीर प्रकार घडला. त्यानंतर मॅनेजर सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय 47, रा. बेबड ओहळ ता. मावळ मूळगाव बाभूळगाव ता.बार्शी सोलापूर) यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी किरण मानसिंग भोसले (वय 47, रा. मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणारा आरोपी अर्थात कंपनीतील कामगार कुमार ओझरकर (वय 25, रा. शिवणे, मावळ) याला अटक केली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ( worker killed manager sensational incident in maval taluka )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मॅनेजर सुधीर अडसूळ व आरोपी कुमार ओझरकर हे एग्रो कंपनीत कामाला होते. मॅनेजर अडसूळ हे आरोपी ओझरकर याला कंपनीत काम सांगत होते. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. त्याचा राग आरोपी कुमार ओझरकर याने मनात ठेवून मंगळवारी (दि.19) सायंकाळी मॅनेजर अडसूळ दुचाकीवरून घरी जात असताना, आरोपी ओझरकर आणि त्याचा साथीदार याने पाठलाग करून त्यांना अडवले. त्यांना डोक्यात आणि सर्वांगावर मारहाण करून गंभीर जखमी केले. रक्‍ताच्या थारोळ्यात सोडून फरार झाले. घटनास्थळी शिरगाव परंदवडी पोलिसांनी धाव घेऊन गंभीर जखमी अडसूळ याला सोमाटणे फाटा पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान मॅनेजर अडसूळ यांचा बुधवारी (दि.20) सायंकाळी 5 वा. मृत्यू झाल्याचे घोषित केले. मॅनेजर च्या मागे पत्नी, दोन मुले व आई वडील आहेत घराचा आधार गेल्याने दुः खाचा डोंगर कोसळला.

सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे करत आहेत. याप्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार आहे. आरोपी कुमार याला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct
– लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March
– ‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा


Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade

Next Post

मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ncp-maval

मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.