कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट आता जगासमोर आला आहे. या व्हेरिएंटचे नाव आहे XBB.1.5 असे आहे. आधीच ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या BF.7 ने जगाची डोकेदुखी वाढवली असताना आता हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. BF.7 चे रूग्ण भारतातही आढळू लागले आहेत. कोरोनाचा XBB.1.5 हा व्हेरिएंट BQ1 व्हेरिएंटच्या तुलनेत 120 टक्के वेगाने पसरतो. ( XBB.1.5 New Covid Variant Found In India Even Worse Than Omicron BF.7 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
XBB.1.5 व्हेरिएंट आहे काय?
XBB हा व्हेरिएंट ऑगस्ट महिन्यात भारतात आढळला होता. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे व्हायरलॉजिस्ट एंड्र्यू पेकोज यांनी दिलेल्या माहितीनुसार XBB.1.5 हा व्हेरिएंट XBB चं म्युटेशन आहे. साथरोग विशेषतज्ज्ञ एरिक फेगल डिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हेरिएंट बीक्यू आणि एक्सबीबीच्या तुलनेत जास्त वेगाने पसरू शकतो.
XBB.1.5 व्हेरिएंट इतका घातक का आहे?
XBB.1.5 हा अँटीबॉडीवरही परिणाम करतो. तसेच त्यांना कमोजर बनवतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा इशारा दिला आहे की, XBB.1.5 सारखे व्हेरिएंट येणं हे व्हॅक्सिनचा परिणाम कमी करणारेही ठरू शकतात. तसंच यासारख्या व्हेरिएंटमुळे संसर्ग आणखी वाढू शकतो. व्हॅक्सिन घेतली असेल तरीही या व्हेरिएंटचा संसर्ग होण्याची भीती आहे.
XBB.1.5 व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळा कसा?
प्राप्त माहितीनुसार हा व्हेरिएंट प्रतिकारशक्तीशी लढून पुढे जाऊ शकतो. तसेच आपल्या शरीराच्या पेशींमध्ये हा व्हेरिएंट आरामात प्रवेश करू शकतो. तसेच XBB किंवा BQ या व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट जास्त वेगाने पसरतो.
XBB.1.5 व्हेरिएंटची लक्षणं काय?
या व्हेरिएंटची लक्षणे इतर व्हेरिएंटच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. मात्र या व्हेरिएंटच्या प्रमुख लक्षणांमध्ये नाक वाहणं, घसा खवखवणं, ताप येणे, शिंका येणे, सर्दी, खोकला आणि आवाज बसणे ही आहेत.
अधिक वाचा –
– अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गुन्हेगारी, विकासकामांच्या मुद्यांवर आमदार सुनिल शेळके सभागृहात आक्रमक – व्हिडिओ
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– मुळशी संघर्ष समितीच्या आंदोलनावर रोखठोक चर्चा । राजकारण्यांच्या तालुक्यात राजकारणापासून अलिप्त राहून काम कसं करणार?