यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज, गुरुवार (दि. 18) 6 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे किमी 07.560 चिखले ब्रीज इथे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम स. 11 वा. ते सायं 5 वाजताच्या दरम्यान करण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे वरील नियोजित कामाच्या वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ( Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway Remain Closed For 6 Hours On Thursday 18 January 2024 )
पर्यायी मार्ग –
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. ५५.००० वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने व बसेस मुंबई लेन कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोल नाका शेवटच्या लेन ने खालापूर एक्झिट कि.मी. ३२.५०० येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६०० पनवेल एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
अधिक वाचा –
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval
– आता कितीही पाऊस पडू दे आणि कितीही पूर येऊदे!! वाडिवळेसह ‘या’ 9 गावांची चिंता कायमची मिटली । Maval News