पुणे जिल्हा परिषद मार्फत आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन 2022 23 या वर्षातील बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. वडगाव बीट स्तरावर झालेल्या बीट स्पर्धेत लहान गट – मुले यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंदनवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
मावळ तालुका पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, केंद्रप्रमुख पोपटराव चौगुले तसेच परंदवडीचे मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ( Yashwantrao Chavan Sports Festival 2022 Chandanwadi School Students Achieve Great Success in Beat Level Sports Competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने खेळून यश संपादन केले. खरेतर जी मुले शाळेच्या प्रवाहात येण्यासही घाबरतात त्या मुलांनी आज बीट स्तरावर एवढ्या मोठ्या संघांना पराभूत करून त्यांच्यातील क्रीडा कौशल्ये सर्वांना दाखवून दिले, ही बाब वाखण्याजोगी आहे.
अधिक वाचा –
– व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
– छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारींचे अवमानकारक विधान; लोणावळ्यात महाविकासआघाडीचे आंदोलन