Dainik Maval News : सांगिसे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेचे मावळते चेअरमन बबन टाकळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी विहित मुदतेत रिक्त पदासाठी राणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी योगेश राणे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
याप्रसंगी नवनियुक्त चेअरमन योगेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाऊसाहेब बांगर, संजय गरूड, कैलास गरुड, गोरख बांगर, शिवाजी टाकळकर, विठ्ठल शिरसाट, देवराम शिरसाट, तुकाराम खरात, गौतम थोरात, ज्योती गरुड, ज्योती ढवळे, निवृत्ती टाकळकर, निखिल वावरे, सचिव अंकुश टाकळकर उपस्थित होते.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांना विचारात घेऊन आगामी काळात कामकाज करणार असल्याचे आणि सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन योगेश राणे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा