आज, मंगळवार ( 5 डिसेंबर) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुंबई येथील काही तरुण तळेगाव स्टेशन येथील तलावात पोहण्यासाठी उतरले होते. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक तरुण बुडाल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना तसेच पोलीस प्रशासनाला कळवण्यात आली. त्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निलेश गराडे (संस्थापक), गणेश निसाळ, भास्कर माळी, गणेश ढोरे, ओंकार भेगडे, शुभम काकडे, सर्जेस पाटील आणि इतर सभासद पोहोचले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्या वेळीस तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अधिकारी प्रविण माने यांनी अग्निशमन विभागाला देखील या घटनेची माहिती दिल्यावर शेखर खोमणे, ताहीर मोमीन, रियाज मुलानी, शुभम काळोखे, अक्षय घोडेकर हे त्या ठिकाणी पोहोचले. सर्वांनी एकत्र प्रयत्न करत सदर पाण्यात बुडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश मिळवले. त्याला पाण्यातून बाहेर काढून प्रथमोपचार देण्यात आला आणि त्यानंतर लगेच त्याला ॲम्बुलन्स मधून दवाखान्यात पाठवलेले आहे. ( Young drowned in Talegaon Dabhade station pond )
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी