व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी

गेली अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. कच्चा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील कमी झाली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2023
in लोकल, ग्रामीण
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team MLA Sunil Shelke


आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळातील नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या गावांना भंडारा डोंगराच्या मागील बाजुने जोडणारा ग्रामीण मार्ग-54 रस्त्यासाठी सुमारे सात कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे.या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार (दि. 3 डिसेंबर) संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेली अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. कच्चा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील कमी झाली होती. परंतु जांबवडे, सुदवडी परिसरात नागरीकांनी छोटी-मोठी घरे बांधल्याने या भागातील नागरिकीकरण वाढत आहे. तसेच या परिसरात ठाकर वस्त्या असल्यामुळे येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने हा रस्ता होणे आवश्यक होते. ( seven crores Fund available for Nanoli Sudumbare road through MLA Sunil Shelke )

उपलब्ध झालेल्या निधीतून 3.75 मीटर रुंदीचा सुमारे सात किलोमीटरपेक्षा अधिक रस्ता होणार असून साईटपट्ट्या देखील करण्यात येणार आहेत. आवश्यक ठिकाणी पाणी जाण्यासाठी व्यवस्था तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील दळणवळणास गती मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

“सुदवडी,जांबवडे परिसरात प्लॉटधारक रहिवाशांची संख्या वाढत आहे.त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते.हा नवीन रस्ता झाल्यानंतर गावांच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी भरघोस निधी दिल्याने पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.” – लोकनियुक्त सरपंच सुमित कराळे

या कार्यक्रमास सुदवडी गावचे उपसरपंच वैभव गाडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब कराळे, आकाश गोतारणे, वैशाली शिंदे, प्रिती शिंदे, सायली कराळे, गोरक्षनाथ गाडे, किसनराव कराळे,संचालक गजानन कराळे,नारायण मालपोटे, दिनेश चव्हाण,बाळासाहेब कराळे,नेहा शिंदे, नितीन ताठे,रमेश कराळे,दत्तात्रय कराळे, सुरेश शिंदे,सुखदेव कराळे, बाबाजी खेडेकर,रमेश बाळसराफ, राष्ट्रवादी काँग्रेस गाव अध्यक्ष ज्ञानोबा कराळे,संतोष ताठे,अशोक गाडे, सतीश काळे,अवतार शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगावमधील सिंधुताई उद्योग केंद्रातील दिव्यांग व्यक्तींची इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी
– दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना
– सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी


Previous Post

क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News

Next Post

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barne

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.