व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे क्रिक्रेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2023
in महाराष्ट्र
Ravi-Shastri

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तथा क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2023 – 24 चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाध्यक्ष संतोष जंगम – अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी उद्घाटक क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रमुख पाहुणे आस्वाद पाटील यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरकुल क्रीडा महोत्सव 2023 – 24 चे आयोजन दि. 2 डिसेंबर 2023 रोजी जनता विद्यालयाच्या कै. मो. श्री. पंत पाटणकर क्रीडांगणावर आयोजित केला गेला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात हजारो विद्यार्थी, खेळाडू, पालक आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध कला आणि क्रीडा कौशल्यांचे प्रात्यक्षिक तथा सादरीकरण करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे अनावरण, ध्वजारोहण, खेळाडूंचे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त संस्थेतील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. ( Cricketer Ravi Shastri inaugurated the annual sports festival Khopoli News )

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन पर भाषणात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हा सोहळा पाहिल्यावर मला माझे शालेय जीवनातील दिवस आठवल्याचे सांगत क्रीडा स्पर्धेत सहभाग हा महत्त्वाचा असतो, हार जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा असे प्रतिपादन केले. खेळातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, खेळातून शिस्त अंगी भिणते, यश पचविण्याच्या वृत्ती सोबत पराभव स्वीकारण्याची मानसिकता विकसित होते असेही त्यांनी सांगितले.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या क्रीडा रसिकांना शुभेच्छा देताना चक्क मराठीत “खेळाचा सन्मान करा, आनंद लुटा” आणि हजारो खेळाडूंना “जिंका” असे त्यांनी आवाहन केल्यावर टाळ्यांच्या गजरात त्यांनी वाहवा मिळवली. संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. या निमित्ताने संस्थेचे आजी-माजी संचालक आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी भव्य व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या विविध विभागाचे पदाधिकारी, प्राचार्य , प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महोत्सवाच्या भव्यदिव्य संपन्नतेत सहभाग नोंदवला.

अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना
– सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे


dainik maval jahirat

Previous Post

‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली

Next Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.