व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे

पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Shrirang-Barne

Photo Courtesy : Team MP Shrirang Barne


पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत आंदोलनाची भावना वाढत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत लोकल गाडी सुरु करण्याची मागणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट संसदेत केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन आता बंद आहे.

या कालावधीत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तीन तास ब्लॉक घेतला जात असल्याचे कारण रेल्वे विभागाकडून दिले जात आहे. मात्र याच कालावधीत मालगाड्यांचे संचालन पूर्ण क्षमतेने होत आहे. मालगाड्या चालवून रेल्वे विभाग आर्थिक लाभ घेत आहे. परंतु प्रवासी गाड्या बंद करून देखभालीचे कारण दिले जात आहे.

याबाबत रेल्वे मंत्रालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. तरी देखील रेल्वे विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे-लोणावळा मार्गावर विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, पर्यटक अशा अनेक घटकातील हजारो प्रवासी प्रवास करतात. तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक वसाहतींमध्ये दुसऱ्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी साडेअकरा ते अडीच वाजताच्या कालावधीत येणाऱ्या लोकलचा मोठा फायदा होऊ शकतो. तीन तास लोकल नसल्याने रेल्वे स्थानकांवर विद्यार्थी इतरत्र भटकत राहतात. यामुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत लोकल नसल्याने नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत चीढ निर्माण होत आहे. नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेत लोकल सुरु न केल्यास आपणही या जनआंदोलनात सहभाग घेणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच वरील कालावधीत लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

अधिक वाचा –
– ‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली
– तळेगावमधील सिंधुताई उद्योग केंद्रातील दिव्यांग व्यक्तींची इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी
– दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना


Previous Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी

Next Post

वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-mns

वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.