मावळ तालुक्यातील मौजे आढे इथे पवना नदीवरून पलीकडे जात असताना गजानन राजाराम बोरकर (वय 39, सध्या रा. पिंपळखुटे ता. मावळ; मुळ गाव – जिल्हा बुलढाणा ) हे वाहून गेल्याचा फोन सुधीर सुतार यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे तुषार सातकर यांना केला. त्यानंतर दिनांक 20 सप्टेंबर रोजी दिवसभर सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा शोध लागला नाही.
त्यानंतर पिंपळ खुटे गावचे रहिवासी अमोल हिंगे यांना एका स्थानिक शेतकऱ्यांने फोन करुन सांगितले की एक मृतदेह दिसला आहे. अमोल हिंगे यांनी वन्यजीव रक्षक टीमला संपर्क करून सांगितले असता टीमने पुन्हा एकदा जाऊन सर्च केले. परंतू त्यानंतरही तिथे मृतदेह दिसून आला नाही. अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवले गेले. गुरुवारी (दिनांक 21 सप्टेंबर) रोजी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. तेव्हा आडे गाव ते बेबडओहळ पुलापर्यंत पाहणी केली असता सदर व्यक्ती दिसून आला नाही. मात्र पुढे बेबडओहळ गावाजवळ झाडांच्या वाळलेल्या फांदीला पाण्यांची मोटरला बांधलेल्या मोटारीच्या दोरीला अडकलेला मृतदेह आढळून आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळ पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ यांचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, विनय सावंत, गणेश गायकवाड, शत्रुघ्न रासणकर, रमेश कुंभार, संतोष दहिभाते, शुभम काकडे आदी यावेळी सहभागी होते. ( young man died after being swept away in indrayani river near adhe village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप
– फक्त लोणावळाच नाही तर मावळमधील कुसूर पठार देखील बनणार ‘जागतिक पर्यटन केंद्र’, वाचा काय म्हटलेत अजितदादा…
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश