पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत आढावा बैठक आज (गुरुवार, दिनांक 21 सप्टेंबर) पार पडली. यावेळी लोणावळामधील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी व परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागानं सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करण्याचे आणि सदर पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात आले. ( Kuswali Kusur Pathar in Maval taluka will become a world tourist center ) ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तसेच यावेळी अजित पवार यांनी तालुक्यातील कुसूर पठार बाबतही एक निर्णय घेतला. मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत सदर बैठकीत चर्चा झाली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक माहिती संकलित करावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश
– तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी
– ‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’