Dainik Maval News : अवैधरित्या, विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला देहू गावातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मॅक्झिनसह पिस्टल, १ जिवंत काडतुस आणि लोखंडी कोयता, २ दुचाकी असा १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तरुणाला पोलिसांनी अटक केली. तर दोन विधी संघर्ष ग्रस्त (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेतले आहे.
देहूगाव येथील रिंग रोडवर अभंग शाळेजवळ मंगळवारी (दि.१८) रात्री पावणेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या तरुणाला कोर्टाने शुक्रवार (दि.२१) पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- नागेश शिवकुमार बळवडगी (वय १९, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून पिस्टल व कोयता घेऊन तिघेजण देहुगाव येथील दुकानदारास लुटण्यास जात असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोयेफ शेख, पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे व पथकाने देहुगाव येथील रिंगरोडवर सापळा रचला.
दोन दुचाकीवरून तिघेजण भैरवनाथ चौकातून काळोखे मळाकडे जात असताना अभंग शाळेजवळ घेराव घालून त्यांची झडती घेतली असता एकाच्या कमरेला कोयता लावलेला आढळून आला तर दुचाकीच्या डीक्कीमध्ये एक पिस्टल मॅक्झिनसह व एक जिवंत काडतुस आढळून आले. २ दुचाकी व शस्त्र जप्त करीत तिघाला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाव्हळे करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई