Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सुदवडी गावच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका युवकाला अवैधरित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी दक्षिण म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण-तळेगाव रोडवरील हॉटेल छकुली धाबा समोर, पान टपरीचे शेजारी शिंदेवस्ती, सुदवडी येथे ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई रणधीर रमेश माने यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गणेश अशोक भांडवलकर (वय २६ वर्षे, रा. शिंदेवस्ती, सुदवडी. पुणे, मुळ रा.मु.पो. भांबरडे, माळे, मावळ) असे आरोपीचे नाव असून आरोपी अटकेत आहे. आरोपीवर दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (क) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद वेळी व ठिकाणी आरोपी हा त्याच्या ताब्यात एकुण १३ हजार ७५० रुपये किंमतीचा २७५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या कब्जात विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. पुढील तपास पोउपनि काळे हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला



