व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Dehu Crime : अवैधरित्या पिस्तूल बाळगणे आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांचा अटक

आरोपींवर देहूरोड पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ३५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 1, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि अवैधरित्या पिस्तूल व काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवार ( दि. २७ डिसेंबर २०२५ ) रोजी कांतीलाल काळोखे मैदान, तथास्तु बिल्डींग जवळ देहू तळ्याचा माथा (ता. हवेली) येथे रोडच्या जवळ ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमर शांताराम कदम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. विनायक अंकुश जांभुळकर (वय ३४ वर्षे, रा. देहुगाव) आणि विघ्नेश हनुमंत येळवंडे (वय ४० वर्षे, रा. निघोजे, ता. खेड) अशी आरोपींची नावे असून आरोपी अटकेत आहे. आरोपींवर देहूरोड पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ३५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील दगड अथवा शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे याबाबत मनाई आदेश लागू होते.

असे असतानाही पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करून नमूद वेळी व ठिकाणी आरोपींनी ५२,००० रुपये किमतीचे १ लोखंडी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे ( राऊंड) जवळ बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या जवळ बाळगताना मिळून आले. पुढील तपास पोउपनिरी वाव्हळे हे करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


dainik maval jahirat

Previous Post

गांजा विक्री प्रकरणी युवकाला अटक ; तळेगाव-चाकण रोडवर सुदवडी हद्दीत पोलिसांची कारवाई

Next Post

महाराष्ट्र ही सांताची नव्हे तर संतांची भूमी – हभप कबीर महाराज अत्तार ; मावळात राज्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाची सुरूवात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kirtan Mahotsav at Kamshet Maval by Shri Vitthal Parivar Maval MLA Sunil Shelke

महाराष्ट्र ही सांताची नव्हे तर संतांची भूमी - हभप कबीर महाराज अत्तार ; मावळात राज्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाची सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.