व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

केतन अगरवाल याचा १८ जून रोजी लोहगडावर किल्ल्यावरील दरीत ढकलून खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केतन अगरवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात शनिवारी पाच हजार ५३ पानी आरोपपत्र शनिवारी दाखल केले. खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहे.

केतन अगरवाल याचा १८ जून रोजी लोहगडावर किल्ल्यावरील दरीत ढकलून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया प्रवीण गोयल, तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी यांना अटक करण्यात आली. केतनबरोबर निश्चित करण्यात आलेला विवाह सियाला मान्य नव्हता. तिने प्रियकर चेतन याच्याशी संगनमत करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. चेतनचा मित्र रितेश संजय हंगे याला कटाची माहिती होती.

आरोपी चेतनने त्याला ही माहिती दिली होती. संजय याला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात ग्रामीण पोलिसांनी खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया, तिचा प्रियकर चेतन, त्याचा मित्र संजय यांच्याविरुद्ध पाच हजार ५३ पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात मोबाइलमधील विदा (डाटा), समाज माध्यमातील संवाद, मोबाइलवरील संपर्क (काॅल डिटेल रिकाॅर्ड-सीडीआर), तांत्रिक तपासाबाबतचा अहवाल, तसेच साक्षीदारांचे जबाब, कागदपत्रांचा समावेश आहे.

  • केतन अगरवाल खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. लोहगडावरील सिया आणि चेतन यांच्या संशयास्पद हालचाली साक्षीदारांनी पाहिल्या होत्या. महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

मार्च २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी भागातील एका २१ वर्षीय तरुणीचा लोहगडावरुन पडून मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती सिया आणि चेतनने इंटरनेटवरुन घेतली होती. मध्य प्रदेशातील सोनम रघुवंशी हिने पती राजा यांचा प्रियकराच्या मदतीने मेघालय येथे खून केल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणाची माहिती त्यांनी इंटरनेटवरुन घेतली होती.

गुन्हेगारीवर बेतलेले चित्रपट त्यांनी पाहिले होते. लोहगडावर केतनला बोलाविण्यासाठी सियाने ‘माही’या नावाने बनावट खाते उघडले होते. माही तिची मैत्रिण असल्याचे तिने केतनला भासिवले होते. माहीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने केतनला लोहगडावरुन बोलावून घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी आरोपपत्रात दिली आहे.

आरोपपत्रात काय?
– केतनच्या हत्येसाठी लोणावळ्यातील विविध ठिकाणांची माहिती घेतली
– २१ मे रोजी लोणावळ्यातील टायगर पाॅईंट, दुर्गम भागांची पाहणी
– आरोपी चेतनचा मित्र संजय हंगे याचा खून प्रकरणात महत्वाचा सहभाग
– संजय हंगे याने चेतन आणि सियाला खून प्रकरणात मदत केली
– तीन आरोपींविरुद्ध भक्कम तांत्रिक पुरावे
– केतनला लोहगडावरुन ढकलून देण्यासाठी ३१ मे रोजी जागा निश्चित केली
– प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.