Dainik Maval News : कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी परंदवडी रोड जवळ ( ता. मावळ) एता तरूणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिस्तूलासह ताब्यात घेतले. अजय गुलाब साळुंके ( वय २३ वर्षे, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे ) असे पिस्तुलासह अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत ( मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
ही कारवाई मंगळवारी (दि. १४ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री १२.२० वाजता श्री चौराई सिटी समोर, परंदवडी रोड, सोमाटणे फाटा ( ता मावळ ) येथे करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद नमुद ठिकाणी व वेळी आरोपी अजय साळुंके हा ५२,००० रूपये किमतीचे १ लोखंडी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे (राऊंड) अवैधरित्या जवळ बाळगताना आढळून आला. शिरगावचे पोउपनि लोहेकर हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा