Dainik Maval News : विक्रीच्या उद्देशाने जवळ गांजा बाळगून असलेल्या युवकाला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.28 सप्टेंबर) रोजी सकाळी 11.40 वाजताच्या सुमारास उपजिल्हा रूग्णालय, कान्हे फाटा येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन भगवान काळे (वय 42 वर्षे) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी, सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय 26 वर्षे, रा. जांभुळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुं. औ. आणि म. परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), II (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.28) रोजी उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट कान्हे फाटा येथील गेट नंबर 1 च्या समोर रस्त्यावर सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय 26 वर्षे, रा. अनंत सृष्टी सोसायटी, जांभुळ, ता. मावळ) हा त्याच्या ताब्यातील ॲक्टीव्हा स्कुटरच्या (क्र. MH 14 LF 8933) डिक्कीमध्ये 985 ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून वाहतुक करताना मिळून आला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 8 (क), 20 (ब) 11 (अ) एन डी पी एस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपीकडून एकूण 20,000 रूपये किंमतीच्या हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकचे पिशवीला सेलोटेपचे वेस्टन असलेला 985 ग्रॅम इतका ‘गांजा’ हा अंमली पदार्थ, 20,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन, 70,000 रुपये किमतीची दुचाकी (क्र. एम एच 14 एल एफ 8933) असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई एस. ए. जावळे हे करीत आहेत.
ही कारवाई संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, हेड कॉन्स्टेबल सचिन काळे, उमाजी मुंढे, सचिन देशमुख, पोलीस शिपाई विठ्ठल पतुरे, अधिकराव झेले यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन । Talegaon Dabhade
– महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar
– रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक, वडगाव मावळ वनविभागाची कारवाई । Maval News