Dainik Maval News : राज्यात विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. नुकतीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट पाच ने देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली.
पोलिसांनी एका युवकाकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर (गुन्हे शाखा युनिट ५, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी नौशाद नजीर शेख (वय २५ वर्षे, रा. देहूरोड) यावर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.
आरोप नौशाद शेख याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा. पो.का. कलम ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२३) देहूरोड मधील गांधीनगर भागातील दत्त मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली.
आरोपी नौशाद शेख हा एका मेडीकल स्टोअर्स जवळ एख गावठी पिस्तूल किंमत ४० हजार रुपये आणि २ हजार रुपयांचे २ जिवंत काडतूसे (पितळी राऊंड) जवळ बाळगताना मिळून आला. त्यामुळे त्यावर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश