पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 13 मे) मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड मधील डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. ( youth came to Pimpri Chinchwad from London and cast his vote Maval Lok Sabha Constituency )
आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण
– मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले