टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : युवा उद्योजक संतोष जांभूळकर यांच्या संकल्पनेतून गावातील तरुणांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक तरुणांना 1 फळ रोप देऊन वृक्षारोपण करण्यात आले. टाकवे गावातील युवा उद्योजक पै. स्वप्नील असवले, युवानेते संतोष कोंडे, सह्याद्री प्रतिष्ठान मा अध्यक्ष सदानंद पिलाने या मान्यवरांचा वाढदिवस अशाच अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सदानंद पिलाने, भैरवनाथ वॉटर सप्लायर्सचे संतोष कोंडे, एचपी गॅस एजन्सीचे स्वप्निल आसवले या तिघांचेही एकत्रित वाढदिवस साजरे करण्यात आले. यावेळी केक न कापता वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संतोष जांभुळकर यांनी परसबाग तयार केली आहे. त्या परसबागेमधून तिन्ही तरुणांना झाडे देण्यात आली. या झाडांमुळे पुढील पिढीला आणि आता धर्तीवर जीवन जगत असणाऱ्या सर्वांना झाडाच्या ऑक्सिजनचा फायदा होणार आहे, अशा संकल्पनेतून वाढदिवस साजरा करण्यात आलाय
यावेळी सेवा फाऊंडेशन अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत असवले, शिवशाही मित्र मंडळ अध्यक्ष प्रदिप मोढवे, युवा नेते उल्हास असवले, ग्रा.पं. कर्मचारी शशांक खोडे, शंकर गुणाट आदी उपस्थित होते. ( youth celebrated birthday by planting trees in Takve Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता, ॲड. सुरज शिंदे यांचा युक्तीवाद
– ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कामशेतमधील ‘या’ ई-सुविधा केंद्रात सामान्यांना शासकीय योजनांचे लाभ
– मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘गावनिहाय संवाद दौरा’, आगामी निवडणूकांची पायाभरणी?