मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात एका तरुणाने फाशी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार जंगली रमी या ऑनलाईन गेम मध्ये 20 हजार रुपये हरल्याने सदर तरुणाने फाशी घेतल्याची माहिती मिळत आहे.
गणेश सोमनाथ काळदंते (रा. तळेगाव दाभाडे) असे सदर तरुणाचे आहे. गणेश हा कॅब चालक होता. तो स्वतःची गाडी चालवायचा. परंतू, त्या व्यतिरिक्त त्याला जंगली रमी खेळण्याचं व्यसन होतं, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली. ( Youth Committed Suicide at Talegaon Dabhade in Maval Taluka after losing money in Junglee Rummy Game )
रविवारी गणेशने घरात सर्वजण असताना स्वतःच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री गणेश बाहेर का येत नाही म्हणून दरवाजा ठोठावला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडला, तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उजेडात आले. गणेश हा सतत मोबाईलमध्ये असायचा, अशी माहिती समोर आली आहे. ऑनलाइन जंगली रमीमध्ये 20 हजार हरल्याने त्याने गळफास घेतल्याचा संशय तळेगाव दाभाडे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा –
– माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सन्मान । Talegaon Dabhade
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो