Dainik Maval News : बेकायदा आणि विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. शुक्रवारी (दि.१५ नोव्हेंबर) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव दाभाडे हद्दीतील हॉटेल मिनाक्षी समोर ही कारवाई करण्यात आली.
आकाश गणेश चव्हाण (वय २४ वर्षे रा. तळेगाव स्टेशन, ता.मावळ) असे पिस्तूलासह अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधाकर विश्वनाथ केंद्रे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आकाश चव्हाण याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महा.पो.का. क. ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारखेस व वेळी संबंधित आरोपी त्याच्या ताब्यात बेकायदा बिनापरवाना ३० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्टल बाळगला असताना मिळून आला. तळेगाव पोलीसचे सहाय्यक पोलीस फौजदार कदम हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’