Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळ चे दहा गण अशा एकूण पंधरा जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि. 16) सुरूवात झाली. दरम्यान पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
११५ उमेदवारी अर्जांची विक्री
दरम्यान उमेदवारी अर्ज एकही दाखल झालेला नसला तरीही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झालेच्या पहिल्या दिवशी एकूण ७४ आणि दुसऱ्या दिवशी एकूण ४१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, अर्थात आजमितीस एकूण ११५ उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणूका येत्या पाच फेब्रुवारीला होणार आहे. मावळात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज विक्रीची व भरलेले अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव येथील तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. त्यासाठी कार्यालयाच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे. दाखल झालेले अर्ज तपासण्याचीही व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला