व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 13, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Maharashtra State Election Commission

File Image


Dainik Maval News : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल आज (दि. १३ ) वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याने या पत्रकार परिषदेत झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक तर ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आज (दि. १३ ) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोग याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद #जिल्हा_परिषद#पंचायतसमिती #पत्रकार_परिषद #निवडणूक #निवडणूक_आयोग #StateElectionCommission#SEC_Maharashtra pic.twitter.com/hCmsgjYE54

— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) January 13, 2026

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांत राज्य सरकारने आचारसंहिता जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार (दि. १३ जानेवारी) पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते.

५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नसलेल्या १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आयोग आणि राज्य सरकारने हालचालींना वेग दिला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक


Previous Post

धक्कादायक ! मित्रांमध्ये दारू प्यायची पैज लागली.. जास्त दारू प्यायल्याने एकाचा मृत्यू, नवलाख उंबरे येथील प्रकार

Next Post

भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP new chapter of Fear-Free Mumbai Home Minister Devendra Fadnavis Zero Tolerance policy

भाजपाकडून 'भयमुक्त मुंबई'चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.