पुण्यातील नौरोसजी वाडिया कॉलेज येथे झूलॉजी डिपार्टमेंट कडून झू फेस्ट साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित अनेक पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही विद्यार्थ्यांच्या या फेस्टला शुभेच्छा दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
झू फेस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांच्याविषयी पोस्टर बनवले होते. तसेच पुतळे, फोटो, रांगोळी यांतूनही झू फेस्ट अधिक प्रभावी करण्यात आला. या वेळी झूलॉजी डिपार्टमेंट चे एचओडी आणि सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांत भाग घेऊन जनजागृती केली. वेगवेगळ्या प्राण्यांची दर्शन सजावटीत घडवले. खास बाब म्हणजे यात नष्ट झालेले डायनासोर देखील दाखवण्यात आले. तसेच भारतात आढळणारे अनेक दुर्मिळ प्राणी या झू फेस्टमध्ये पुतळ्यांच्या माध्यामातून दाखवण्यात आले. ( Zoo Fest is celebrated by the Department of Zoology at Nowrosji Wadia College Pune )
अधिक वाचा –
– ब्राम्हणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
– न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला 5 संगणक संच भेट; वडगावचे नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांचा स्तुत्य उपक्रम