पुणे जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील साकव पुलांच्या बांधकामांसाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी हि माहिती दिली. ( 1 Crore 20 Lakh Fund For Bridges At Kusgaon Kadamwadi In Maval Taluka Through Pune District Planning Committee )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती फंडातून आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून मावळ तालुक्यातील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी मौजे कुसगाव येथील प.मा. तोंडेवस्ती येथे साकव बांधण्यासाठी 33 लाख 81 हजार रुपये, तर मौजे कदमवाडी येथील मुख्य रस्ता ते कदमवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर साकव बांधण्यासाठी 48 लाख 43 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अधिक वाचा –
– पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध, अध्यक्षपदी शरद शेलार, वाचा सविस्तर
– ब्रेकिंग! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी