पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध पार पडली आहे. मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकाची पहिली बैठक देखील आज (शनिवार, 4 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीला माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे हे उपस्थित होते. ( Board of Directors of Pai Vishwanathrao Bhegade Nagari Sahakari Patsanstha Elected Unopposed Sharad Shelar Became Chairman )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ…
पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरदराव शंकरराव शेलार यांची निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी दिपक निवृत्ती भेगडे यांची निवड करण्यात आली. यासह सचिवपदी मंगेश हणमंत सरोदे, खजिनदारपदी रणजित बाळासाहेब पिंगळे यांची निवड करण्यात आली.
संचालकपदी दत्तात्रय पंढरीनाथ नाटक, अरुण जगन्नाथ भेगडे, अरुण भगवान भेगडे, समिर खंडू जाधव, मनोज सूर्यकांत मेहता, नितीन भगवान पोटे, रविंद्र प्रकाश मुऱ्हे, तनुजा आनंद भेगडे, शोभा सुनिल परदेशी यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडेही यावेळी उपस्थित होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद खोतकर यांनी काम पाहिले. पतसंस्थेचे व्यवस्थापक वाळुंज हेही उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी
– तळेगाव दाभाडे शहरात पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत होणाऱ्या विकासकामांसंदर्भात विभागीय आढावा बैठक संपन्न