महाराष्ट्र पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने हादरला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातील मृतांचा आकडा अधिक वाढू शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुःखद आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023
धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे. ( 12 people died after entering container hotel on Mumbai Agra highway in Dhule district )
अधिक वाचा –
– धक्कादायक! दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा इंद्रायणीत बुडून मृत्यू, इंदोरी पुलाजवळील घटना
– मोठी बातमी! शरद पवारांनी दिल्लीत केला मोठा बदल, ‘या’ विश्वासू नेत्याकडे सोपवली महत्वाची जबाबदारी