आमदार विकास निधी अंतर्गत 1 कोटी 48 लक्ष निधीतून मावळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचे लोकार्पण शनिवारी (दि. 16 डिसेंबर) करण्यात आले. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपुर्ण व्हावीत या संकल्पनेला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या 15 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये साते, ताजे, वेहेरगाव, मुंढावरे,शिलाटणे, मळवली, कुणे ना.मा., वराळे, कुरवंडे,कान्हे, शिवणे,जांभूळ, भोयरे, टाकवे बु.,नवलाख उंबरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ( 15 gram panchayats of maval taluka received garbage carts through mla sunil shelke )
अधिक वाचा –
– दैनिक मावळ ‘संवाद’ : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्यासोबत खास बातचीत
– शेजाऱ्याने बांध कोरलाय? शेतजमीनीची शासकीय पद्धतीने मोजणी करायचीये? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, शुल्क आणि कागदपत्रे
– मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभुळकर; दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन