पुणे (दि 8 फेब्रुवारी 2024) : आळंदी नजीकच्या सोळू गावात (ता. खेड) गुरूवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास महावितरणच्या वितरण रोहित्राचा (Distribution Transformer) स्फोट होऊन काही घरांना आग लागल्याची माहिती चुकीची आहे. या आगीशी महावितरणचा काहीही संबंध नाही. तसेच वीजबिलाच्या थकबाकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आलाय. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आळंदी नजीक मरकळ रस्त्यावरील सोळू (ता. खेड) या गावात गुरुवारी दुपारी आग लागली. ज्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. या ठिकाणी असलेल्या वितरण रोहित्राचा (Distribution Transformer) स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे व सहायक अभियंता संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या 63 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही. ( 2 killed 5 injured in fire incident at solu village near alandi khed taluka pune updates )
आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की, या रोहित्रावरून केवळ एका ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचे घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
– मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर
– मोठी कारवाई! लोणावळ्यात विदेशी दारूचा साठा जप्त, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune Crime